Breaking

Monday, 29 March 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, समाधान आवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, समाधान आवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब- याबाबत वृत्त असे की मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पोटनिवडणुक ही चांगलीच चुरशीची होणार आहे, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप कडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे समाधान आवताडे यांना भाजप कडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे याबाबतची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले आहे समाधान आवताडे यांनी 2014ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती 2019 ला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते समाधान आवताडे हे एक उद्योजक आहेत समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा देणे त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले त्यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची जागा रिक्त झाली त्यानंतर भाजपने राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली या निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली होती या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली होती त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हंटलं जात आहे भाजपने पोट निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्रीताई  भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर भाजप कडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे पण परिसरात गट सध्या पोट निवडणूक लढण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment