माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन;
घेतला अखेरचा श्वास....
माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे.
पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते ९१ वर्षांचे होते.
मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.
पी बी सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी.) घेतली. त्यानंतर त्यांनी मे.मुंबई हायकोर्ट, मे.सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं.
पी बी सावंत १९८९ ते १९९५ या काळात मे.सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते.
१९९५ मध्ये ते निवृत्त झाले.
सेवानिवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय होते
तसंच आग्रहानं भूमिका मांडत होते.
वर्ल्ड प्रेस कऊन्सिल आणि प्रेस कऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं.
तसंच यादरम्यान लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं होतं.
पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती.
तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते.
मात्र मतभेद तसंच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.
गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापित तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे देखील ते सदस्य होते.
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे देश एका महान विधिज्ञास मुकला.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


No comments:
Post a Comment