Breaking

Tuesday, 16 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ मुंबई सह नाशिक, पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक अपघात.


मुंबईसह नाशिक, पुणे ग्रामीण भागांत सर्वाधिक अपघात,
राज्यात एकूण ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू, 
प्राणांतिक अपघातांत १० टक्क्यांनी घट......

 मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन हे चालकाबरोबरच वाहनांतील सहप्रवासी तसेच अन्य वाहनातील प्रवासी आणि पादचाऱ्यांच्याही जिवावर बेतू शकते. 
नियम उल्लंघन केल्यानेच राज्यात गेल्या वर्षी २४ हजार ९७१ अपघातांत ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. 
२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रस्ते अपघातांत २४ टक्क्यांनी, तर प्राणांतिक अपघातांमध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. 
करोनामुळे मार्च २०२० ते जून २०२० पर्यंत रस्त्यांवरील वाहन संख्या कमीच होती. 
त्यामुळे अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचा अंदाज महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
अपघात कमी करण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, परिवहन विभाग कठोर कारवाई करतानाच जनजागृतीही करतात. 
तरीही चालकांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याने दरवर्षी राज्यात साधारण ३० हजारांच्या पुढे रस्ते अपघात होतात. 
पोलिसांकडून प्रशिक्षण अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ‘गोल्डन अवर्स’ महत्त्वाचा ठरतो. 
अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी गावकरी, पेट्रोल पंप, टोल नाके व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
अपघातातील जखमी व्यक्तीचा रक्तस्राव कापूस, रुमाल किंवा एखाद्या कपड्याने कसा थांबवावा,  वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देणे (पम्पिंग) इत्यादीचे प्रशिक्षण महामार्गांलगत असलेल्या गावकरी, स्थानिकांना देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment