Breaking

Monday, 15 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी, पाच हजार वर्षांपूर्वीचं रहस्य उघड.


जगातील सर्वात प्राचीन बिअर फॅक्टरी; 
५ हजार वर्षापूर्वीचं रहस्य उघड.....
 
इजिप्त हा देश प्राचीन संस्कृती आणि रहस्यमय वास्तूंसाठी ओळखला जातो. 
इजिप्तमध्ये हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या अनेक वास्तू आहेत. 
यात गिझाचे पिरॅमीड, देवदेवतांची हजारो वर्षांपूर्वीची मंदिर, थडगी, ममीज् असा मोठा एतिहासिक खजिना या देशात आहे.
 नुकत्याच एका संशोधनात इजिप्तमध्ये एका पुरातन बिअर फॅक्टरीच्या अवशेषांचा शोध लागला आहे.
 ही बिअर फॅक्टरी ५ हजार वर्ष जुनी असल्याचा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे.
 एबिडोस इथल्या दफनभूमीत इजिप्त आणि अमेरिकेच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी उत्खननाचं काम हाती घेतलं आहे. 
या दफनभूमीत उत्खनन करत असताना काही पुरातन अवशेष हाती लागले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे. 
उत्खननात सापडलेल्या बिअर फॅक्टरीचा फोटो इजिप्त सरकारनं शेअर करत ही माहिती दिली आहे.
 (Facebook-इजिप्त पुरातत्व आणि पर्यटन विभाग) एबिडोस इथल्या उत्खननादरम्यान ४0 मोठी मातीची भांडी सापडली आहेत. 
दोन रांगांमध्ये ही मातीची भांडी रचून ठेवल्याचं आढळून आलं. 
इजिप्त आणि अमेरिकेतील पुरातत्व शास्त्रज्ञांचं पथक एबिडोसच्या दफनभूमीत उत्खनन करत असताना मातीच्या भांड्यांचे अवशेष त्यांच्या हाती लागले. 
इजिप्तच्या पुरातत्व खात्याचे सरचिटणीस मुस्तफा वजीर यांनी या उत्खननासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
 मातीचे रांजण असलेली अशी आठ कोठारं उत्खननात सापडली आहेत.
 बिअरच्या निर्मितीसाठी धान्य आणि पाणी मोठ्या भांड्यांमध्ये साठवून ठेवणं गरजेचं असतं. 
यासाठीच ही मातीची भांडी वापरली जात असावी असं मत आभ्यासकांनी मांडलंय. 
५हजार वर्षांपूर्वी एबिडोसच्या या भागात राजा नारमेर याचं राज्य होतं आणि याच काळातील हे अवशेष असल्याचं वजीर यांनी नमूद केलं आहे.

No comments:

Post a Comment