Breaking

Thursday, 4 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ पालिकेच्या शाळा यापुढे 'मुंबई पब्लिक स्कूल'....


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/पालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’....
 
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा २९४५.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. 
गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. 
महापालिकेच्या सर्व शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कूल’ करण्यात आले, हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़. 
गतवर्षीच्या योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात आली आहे.
 महापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू आर्थिक वर्षांत (२०२०-२१) २९४४.५९  कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. 
गेल्या आर्थिक वर्षांतील (२०१९-२०) अर्थसंकल्पापेक्षा त्यात २१०.८२ कोटींनी वाढ 
केली होती. 
मात्र येत्या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. 
या वर्षी भांडवली खर्चासाठी २४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
डिजिटल क्लासरूम, व्हच्र्युअल क्लासरूम, अक्षरशिल्प, स्वसंरक्षण प्रशिक्षण, अपंग विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता अशा जुन्याच योजनांबरोबरच काही नवीन योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
 पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता पालिका शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यामिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येणार आहे. 
त्याकरिता नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. 
त्याचा वापर पालिकेच्या सर्व शाळांसाठी करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment