आजपासून टोलनाक्यांवर फास्ट टॅग (FASTAG) बंधनकारक,
अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल!
टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होण्यासाठी आजपासून (दि.१५) वाहनचालकांना ‘फास्टॅग’ (FASTag) बंधनकारक करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलप्लाझांवर याची अंमलबजावणी केली जाईल.
वाहनांवर फास्टॅग नसूनही फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
फास्टॅग कोणासाठी आणि कुठून मिळेल?
एस.बी.आय, एच.डी.एफ.सी., आय.सी.आय.सी.आय. यासह २५ नामांकित बँकेच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत घेता येतो.
याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अॅमेझॉन आणि माय फास्टॅग अॅपवरही सुविधा उपलब्ध आहे.
तसेच, फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळतो.
हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासूनही रिचार्ज करून मिळेल.
‘फास्टॅग’ खात्यातील टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्यासंबंधीचा एक ‘एस.एम.एस.’ त्यांच्या मोबाइलवर येईल.
खात्यातील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे.
‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल.
त्यानंतर नव्याने टॅग खरेदी करावे लागणार आहे.
कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत.
तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत. ..
तर थर्ड पार्टी इन्शुरन्स नाही केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व चार चाकींसह अन्य वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे.


No comments:
Post a Comment