Breaking

Monday, 22 February 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- संजय दत्त ची सुटका कोणत्या नियमानुसार?


संजय दत्तची सुटका कोणत्या नियमानुसार ?
राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषीची विचारणा......

 मुंबई : राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा ए. जी. पेरारीवलन (४८) याने मे.मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून अभिनेता संजय दत्त याची वेळेआधीच कारागृहातून सुटका झाल्याची माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. 
या याचिकेची दखल घेत मे.न्यायालयाने राज्याच्या माहिती आयुक्तांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने राज्याच्या माहिती आयुक्तांना नोटीस बजावत प्रकरणाची सुनावणी पुढील महिन्यात ठेवली आहे. 
पेरारीवलन याच्याप्रमाणे संजय दत्तलाही १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत शिक्षा झाली होती. 
दत्त याला शिक्षेत सवलत देण्याला आक्षेप नाही. 
परंतु शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच झालेल्या सुटकेची माहिती उपलब्ध झाल्यास आपणही त्याच मुद्दय़ांचा आधार घेत शिक्षेत माफी मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू करू, असा दावा पेरारीवलन याने याचिकेत केला आहे. 
माहिती अधिकाराखाली त्याने संजय दत्तच्या सुटकेबाबत संपूर्ण माहिती मागितली होती. 
मात्र महाराष्ट्रातील संबंधित यंत्रणांकडून आपल्याला आवश्यक तो प्रतिसाद न मिळाल्याने याचिका करत असल्याचे त्याने म्हटले आहे. 
राजीव गांधी यांची हत्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॉम्बमध्ये वापरण्यात आलेल्या नऊ वोल्टच्या बॅटरी पुरवल्याच्या आरोपाखाली पेरारीवलन याला वयाच्या १९ व्या वर्षी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 
गेले २९ वर्षे तो कारागृहात आहे.

No comments:

Post a Comment