Breaking

Thursday, 4 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ महसूलात 5876 कोटींची घट.


महसुलात ५८७६ कोटींची घट.....
 
कोरोना संसर्गामुळे निर्माण परिस्थितीत वर्षभरात मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क, गुंतवणुकीवरील व्याज, विविध सवलती यामुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 
चालू वर्षांतील अर्थसंकल्पातील अंदाजित महसुलात तब्बल ५८७६.१७ कोटी रुपयांनी घट झाली आहे. 
त्यामुळे पालिकेच्या दारी अर्थसंकट उभे राहिले आहे.
 चालू वर्षांत पालिकेला २८,४४८.३० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा २०२०-२१ या वर्षांच्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली होती. 
मात्र निर्माण परिस्थिती लक्षात घेत उत्पन्न २२,५७२.१३ कोटी रुपये असे सुधारित करण्यात आले. 
परिणामी अंदाजित उत्पन्नात ५८७६.१७ कोटी रुपयांनी घट झाली आहे. 
ही बाब लक्षात घेत आगामी अर्थसंकल्पात २७८११.५७ कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
चालू वर्षांच्या तुलनेत तो ६३६.७३ कोटी रुपयांनी कमी आहे. 
मालमत्ता करापोटी २०२०-२१ मध्ये ६७६८.५८ कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 
मात्र सुधारित अंदाजानुसार पालिकेने ४५०० कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे.
 साहजिकच त्यामुळे महसुलात २२६८.५८ कोटी रुपयांची घट झाली आहे. 
करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. 
परिणामी लहान-मोठे उद्योगधंदे बंद होते.
 त्याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवर झाला आहे. 
तसेच करोनाविषयक कामांसाठी करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
त्यामुळे करवसुली होऊ शकली नाही. 
करोना संसर्गामुळे निर्माण परिस्थितीत नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 
त्यामुळे भांडवली मूल्यामध्ये सुधारणा लांबणीवर टाकण्यात आली असून २०१९-२० प्रमाणेच आगामी वर्षांत मालमत्ता कराची आकारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment