Breaking

Monday, 15 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ व्हॅलेन्टाइन डे ला तोडफोड, भाजपच्या माजी आमदारासह 17 जणांना अटक.


‘व्हॅलेंटाईन डे’ला तोडफोड : 
भा.ज.पा.च्या माजी आमदारासह १७ जणांना अटक.....
 
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत रेस्टॉरंट आणि हुक्का बारची तोडफोड केल्याप्रकरणी भा.ज.पा.च्या माजी आमदारासह १७ जणांना अटक करण्यात आली आहे. 
भोपाळ शहरात व्हॅलेंटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी तोडफोड करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. 
पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर तोडफोड करणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यात आली. 
त्यानंतर माजी आमदार सुरेंद्र नाथ सिंग यांच्यासह १७ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती भोपाळचे पोलीस महासंचालक इर्शाद वाली यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. 
तोडफोड करणारे आरोपी भारतीय जनता युवा मोर्चा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. 
 आरोपींनी भगवे झेंडे फडकवत आणि जय श्रीराम अशा घोषणा देत तोडफोड केली. 
पहिल्या घटनेत कार्यकर्त्यांनी भोपाळमधील श्यामला हिल्स परिसरात असलेल्या जंकयार्ड कॅफेला लक्ष्य केलं. 
हॉकी स्टीक आणि बॅट घेऊन आरोपींनी कॅफेत जाऊन गोंधळ घातला. 
कॅफेतील ग्राहकांशी गैरवर्तन केलं. 
याप्रकरणी कॅफेचे मॅनेजर नरेंद्र कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
१२.२० वाजता आठ जणांच्या गटाने येऊन कॅफेत गोंधळ घातला, शिवीगाळ करत तोडफोड केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. 
“तुम्ही लोक लव जिहादला प्रोत्साहन देत आहात.
 हा फक्त ट्रेलर आहे. 
तुम्ही लोक पुन्हा कॅफेत दिसलात, तर जीव घेऊ,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
 याचदरम्यान, १० जणांच्या गटाने बिट्टन मार्केटजवळ असलेल्या कॉऊबाय रेस्ट्रो बारमध्ये तोडफोड केली.
 यात तीन महिलांचाही समावेश होता. 
राहुल यादव नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

No comments:

Post a Comment