Breaking

Thursday, 8 October 2020

संपादक/ डाॅ. दिगंबर उर्फ डी.टी.शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती.


संपादक/ डाॅ. दिगंबर उर्फ डी.टी.शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती-
याबाबत सविस्तर वृत्त असे की *डॉ. दिगंबर उर्फ डी टी शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती*
 
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी  यांनी मंगळवारी (दि. ६)  डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. 
   डॉ शिर्के यांचे मूळ गाव वाठार तर्फ वडगाव ता.हातकणंगले जि. कोल्हापूर असून त्यांचे आई व वडील तुकाराम शिर्के यांनी दिगंबर यांना मोठ्या कष्टाने शिक्षण दिले.डॉ शिर्के यांनी एम. एससी.(संख्याशास्त्र),एम. फील.,पीएचडी असे उच्च शिक्षण घेऊन आई वडिलांच्या विश्वास सार्थ ठरवला. शिवाजी विद्यापीठातील ३३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी  आहे.
प्र.कुलगुरू,कुलसचिव,संख्याशास्त्र विभाग प्रमूख आणि अधिसभेसह विविध अधिकार मंडळावर केलेल्या कामाचा प्रचंड अनुभव त्यांना आहे. वरील सर्व बाबी आणि उत्तम मुलाखत तसेच प्रचंड दूरदर्शी नेतृत्व या बहुगुणी व्यक्तिमत्वा मुळे डॉ शिर्के यांची कुलगुरूपदी निवड झाली आहे.
   डॉ शिर्के यांच्या पत्नी डॉ सुनिता या सुद्धा प्राध्यापिका आहेत. मुलगा कौस्तुभ एम एस इंजिनियर असून पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये वरिष्ठ अधिकारी आहे,त्याची पत्नी सौ सिद्धेश्वरी या सुद्धा इंजिनियर आहेत.
मुलगी कु. श्रद्धा ही पुणे येथे एम टेक. शिक्षण घेत आहे..उद्योजक अरविंद आणि मधुकर हे त्यांचे भाऊ आहेत.
  कुंभार समाजातील डॉ शिर्के यांनी इतिहास घडवला असून संपूर्ण भारतातील कुंभार समाजातील पाहिले कुलगुरू म्हणून मानाचे स्थान मिळवल्या बद्दल
 डॉ डी.टी.शिर्के, यांचे मनापासून  अभिनंदन व भावी कार्यास  शुभेच्छा!!!
समस्त कुंभार समाजाला तुमचा अभिमान आहे
           *शुभेच्छुक*
हनुमंत कुंभार गुरूजी मोडनिंब.

No comments:

Post a Comment