मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-📡📺🎙️ *CET चं सुधारित वेळापत्रक जाहीर*🎙️📺📡
*पुणे:* राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे तंत्र शिक्षण विभाग तसेच उच्च शिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
सीईटी परीक्षांना येत्या तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती’सीईटी सेल’ने प्रसिद्ध केली आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लिंक देण्यात येणार आहे.
सीईटी परीक्षा सुरक्षित वातावरणात नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतचा तपशील प्रवेशपत्रावर देण्यात येणार आहे.


No comments:
Post a Comment