मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बीड जिल्ह्यातील घटनेतील गावगुंडांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
*बीड:* जिल्ह्यातील घटनेतील गावगुंडांवर मकोका अंतर्गत कार्यवाई करण्याची मागणी
औरंगाबाद, 16 सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मगुरू काजी निजामोद्दीन व सोहेल तांबोळी अंत्यविधीसाठी जात असताना बीड जिल्ह्यातील होळ गावी त्यांची कार झाल्यामुळे उभे असताना गावगूंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ट्रकचालकाच्या मध्यस्थीने त्यांचा जीव वाचला आहे. तरी गुन्हेगाराला अटक करुन मकोका कायदे अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे लोकविकास परिषदेने केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वाहेद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यापूढे असल्या घटना घडू नये, राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना घडवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे याकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया अब्दुल वाहेद यांनी दिली आहे. यावेळी हाफिज मुश्ताक अहेमद, सचिन गाडे, तेजनाथ विश्वकर्मा, डॉ. प्रसाद भोरे, गौतम मकासरे, अँड शरफोद्दीन, महेमूद पठाण, जावेद चाऊस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment