Breaking

Thursday, 14 October 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - कुर्डूवाडीत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तसेच साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने 307 जणांचे मोफत लसीकरण.


*कुर्डुवाडीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या तसेच साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या  वतीने307 जणांचे मोफत लसीकरण*
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा तालुका व साम्राज्य आरमार युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवराञ ऊत्सव,मोहम्मद पैंगबर जयंती,जिवाजी महाले जयंती
तसेच पै.ऊमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज ३०७ नागरीकांना मोफत कोविड-19 लसीकरण करण्यात आले. तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबीर मोफत रक्तातील शुगर तपासणी शिबीरचे ही या वेळी आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे ऊदघाटन प्रथम छञपती शिवराय,शिवरक्षक जिवाजी महाले,मक्का मदीना प्रतीमेचे पुजन करुन तसेच फीत कापुन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या शिबीरात गोविंद कुलकर्णी, डाॅ.विलास मेहता,डाॅ.जयंत करंदीकर,डाॅ.मोहसिण मकणु,मा.नगरसेवक युसुफ दाळवाले,नगरसेवक चंद्रकांत वाघमारे,लक्ष्मण भाऊ पवार,राजेंद्र वाल्मीकी,सुधिर भाऊ गाडेकर,अर्शद मुलाणी,श्रीकांत पाटील,बबलु कांबळे,राहूल धोका,अखलाख दाळवाले यांचे सह मान्यवर ऊपस्थीत होते. या वेळी आभार संस्थापक अध्यक्ष मा उमेश भाऊ पाटील यानी मानले व जास्तीत जास्त लसीकरण ही काळाची गरज असून लसीकरण झाले तरच आपण कोरोना सारख्या जागतिक महामारी वर विजय मिळवु शकतो असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष मा उमेश भाऊ पाटील यांनी केले
या कार्यक्रमासाठी कुर्डूवाडी नगरपरीषद व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्तपणे लस ऊपलब्ध करुन देण्यात आली होती.
नमोकार लॅबरटरीच्या वतीने रक्तगट व रक्तातील शुगर बालाजी लुक्कड यांनी तपासणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी बालाजी गायकवाड, अमित करंजकर, विनायक सातारकर, मुकुल वाघ, श्याम थोपटे,सुरेश खिलारे,  सुहास सरडे,  अण्णा देशमाने, सौरभ जगताप, निखिल लोकरे, रुषि सातारकर, रुषि क्षीरसागर, रोहित देवकुळें, फैय्याज दलवाले, किरण शिंदे, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या सर्व सदस्या नीं परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment