Breaking

Friday, 24 September 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी /मारूती सोमुत्ते - सातारा शहरात वाहू लागले पालिका निवडणुकीचे वारे.


सातारा - सातारा शहरात सध्या आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. त्याची सुरुवातच बॅनरवॉरने सुरू झाली आहे. पालिकेत सत्तेत असलेल्या खासदार छत्रपती उदयनराजे भाेसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून एका कामाच्या शुभारंभाचा बॅनर लावला.
त्यानंतर लगेचच भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहरात तिथेच बाजूला दुसरा बॅनर लावून उदयनराजेंच्या या प्रयत्नावर आक्षेप घेतला आहे. काम कुणाचं आणि नाचतयं कोण? असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी या बॅनर मधून उपस्थित केला आहे.

खासदार उदयनराजे भाेसले यांनी पोवई नाक्यावर 'गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी' सीआरएफ निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या १५ कोटीच्या मार्गाचा प्रारंभ २२ तारखेला घेणार असल्याचा फलक शहरात लावला आहे. त्यांच्या या फलकास प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीने त्याच्या बाजूलाच काम कुणाचं आणि नाचतयं कोण? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा फलक लावला आहे. नगरविकास आघाडीने लावलेल्या फलकावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या मागणीनुसार हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्र छापले आहे. हे दाेन्ही फलक सातारकरांच्या चर्चेचे विषय ठरले आहेत.

No comments:

Post a Comment