मलकापूर ता - कराड येथील लोटस फर्निचर ला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवार दि - 29 रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली . शॉर्ट सर्किट मूळे ही आग लागल्याची ही प्राथमिक अंदाज असून यामध्ये फर्निचर दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ,पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालागत मलकापूर ते नादलापूर ता - कराड दरम्यान हे लोटस फर्निचर चे दुकान आहे , या दुकानाला गुरुवारी भीषण आग लागली . या आगीने अल्पावधीत च भीषण रूप धारण केले . आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले . दरम्यान हे दुकान महामार्गालगत असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांसह बघ्यांची गर्दी मोठी केली होती . दरम्यान ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे . या आगीत फर्निचरचे साहित्य जळून खाक झालें असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment